🕒 1 min read
अमरावती: अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पोलिसांकडून सोमय्या यांनी अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. परिस्थिति नियंत्रणात असली तरी अजूनही संचारबंदी कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर भाष्य करताना म्हणलं की, किरीट सोमय्या यांनी अजून १५ दिवस तरी अमरावतीत येऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. अमरावती पोलिस आयुक्तांनी देखील किरीट सोमय्या यांना पत्रातून दौरा रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आपला दौरा रद्द करतील का याकडे सर्वांचे लक्ष होते.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलताना अमरावती दौरा पुढे ढकलला असल्याचं सांगितलं. अमरावती पोलिसांनी फोन करून मला हा दौरा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. त्यामुळे तूर्तास तरी अमरावती दौरा रद्द केला असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- पोलिसांचा विरोध तरीही अमरावती दौऱ्यावर किरीट सोमय्या ठाम!
- हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार!
- ‘आम्ही या आरोपांकडे…’, भाजपा प्रभारींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली…
- 28 युनियन आहेत, कुणाशी चर्चा करायची हे कामगारांनीच सांगावं- अनिल परब


