मुंबई : क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘ज्या दिवशी क्रूझवर एनसीबीने छापे टाकले त्यावेळी समीर वानखेडे यांनी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतले असे म्हटले होते. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतले होते आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. ‘दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्यानं त्यांच्या नातेवाईकांना सोडलं. समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कोणाला तरी वाचवण्यासाठी नवाब मलिक सनसनाटी निर्माण करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. ‘मलिक हे सरकारमधील मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कॉल रेकॉर्ड तपासणं आणि इतर माहिती घेणं त्यांच्यासाठी सोप आहे. नार्कोटिक विभागाकडून पोलिसांकडून माहिती मिळवून ते तीर मारण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका दरेकर यांनी केली.
‘मूळ विषयापासून दूर जात कोणालातरी वाचवण्यासाठी त्यांचा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती एजन्सीला द्या म्हटल्यावर आमचा एजन्सीजवर विश्वास नसल्याचं ते सांगतात. जर एजन्सीवर आणि न्यायालयावर विश्वास नसेल तर गंभीर आहे. समजून उमजून असे प्रकार सुरु असल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- नियम मोडून तुळजाभवानीचे दर्शन, भाजपच्या आचार्य तुषार भोसलेंविरुद्ध गुन्हा दाखल
- ‘फडणवीसांना निमंत्रण नाही, हिसाब तो जरूर होगा!’, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
- ‘उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर बसणे ही चांगली गोष्ट, हा योग अनेक वर्षांनी येतोय’ नारायण राणेंची प्रतिक्रिया
- ‘उद्घाटनाच्या वेळेला कोणतेही राजकारण करणार नाही’, नारायण राणेंकडून तलवार म्यान
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले’, भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

