Share

पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून वृद्धाची ७० हजारांची फवणूक

Published On: 

🕒 1 min read

जालना : पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून एकाने ७२ वर्षीय वृद्धाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चंद्रकांत रंगनाथराव रामदासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वृद्धाची फवणूक करणाऱ्या भामट्याने चंद्रकांत रामदासी यांना बनावट ओळखपत्र दाखवून, “मी पोलिस उपनिरीक्षक आहे, सध्या तपासणी सुरू आहे, तुमच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चेन रुमालात ठेवा,’ असे सांगितले. नंतर हातचलाखीने रुमाल घेऊन त्यांतील सोने काढून घेतले आणि रुमाल वृद्धाच्या खिशात ठेवून ७० हजार रुपायांची फसवणूक केली.

रामदासी हे मिशन रुग्णालयात गेले असता त्यांनी खिशातील रुमाल काढून तपासला तेव्हा त्यातील सोन्याच्या अंगठ्या आणि साखळी गायब होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिस ठाण्यात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!