Share

दिवाळी गोड करा ; वेतनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनपाला साकडे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना काळात भरती केलेल्या सुमारे ६३० कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपुर्वी महापालिकेने नारळ दिला आहे. सध्या लसीकरणाच्या कामात १३६ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांनाही दोन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर वेळेवर वेतन मिळावे एवढीच माफक अपेक्षा या कंत्राटी कर्मचाऱ्यांची होती. मात्र कायम कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देणाऱ्या पालिकेने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांप्रमाणेच पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून झालेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेने कोरोनाच्या काळात भरती केलेल्या सुमारे ६३० कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी सेवेतून कमी केले आहे. सध्या कोरोना नियंत्रण कामात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार मिळाला नाही. दरम्यान, मनपा प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जिल्हा प्रशासनाकडे निधीची मागणी केली आहे. मात्र दिवाळी तोंडावर असतांना पगार मिळेल याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि कोरोना चाचण्यांच्या कामासाठी सध्या केवळ १३६ कंत्राटी आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. शहरात सध्या ७१ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. तसेच रेल्वेस्टेशन, विमानतळ, प्रमुख सरकारी कार्यालये, शहराची एंट्री पॉइंट आदी ठिकाणी कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या केंद्रांवर हे कर्मचारी तैनात आहेत. मात्र, आता या कर्मचाऱ्यांनाही दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. दिवाळीपूर्वी किमान दोन महिन्यांचा तरी पगार मिळावा अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा ५० ते ५५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला संपावर जाण्याचा इशारा

पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी सणासाठी तातडीने थकबाकीसह वेतन द्यावे, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. जायकवाडी धरणातील पंपहाऊसपासून ते शहरातील जलकुंभापर्यंत विविध कामांत पाणीपुरवठ्याचे सुमारे दीडशे कंत्राटी कामगार काम करतात. त्यांनी काम बंद आंदोलन केल्यास सुरळीत पाणीपुरवठ्यात अडचणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!