Share

कोरोना पसरणार नाही असे नियम लावा पण गणेशोत्सव साजरा करू द्या – आशिष शेलार

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं असून राज्य सरकारने याबाबत नियमावली देखील जाहीर केली आहे. बऱ्याच गोष्टींना यात निर्बंध घालण्यात आले असून आता भाजपने सणांवरील निर्बंध कमी करून उत्सव साजरे करू द्यावेत तसेच मंदिरे खुली करावीत अशी मागणी केली आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी नियम लावा पण गणेशोत्सव साजरे करू द्या, अशी मागणी केली आहे. ‘आमची भूमिका स्पष्ट आहे, नियमावली करून मंदिर उघडा. प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदु सणांवर आक्रमण बंद करा!’, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!