नाशिक: येवला तालुक्यातील नागडे येथील भोंदूबाबा व त्याच्या भावाचा आईसह तिच्या ३ मुलींवर बलात्कार व धर्म परिवर्तनासाठी बळजबरी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी येवल्यात घडली होती. याच बलात्कार प्रकरणा संदर्भात चौकशीसाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ येवला येथे पीडितेच्या घरी गेल्या होत्या. तसेच शहर पोलीस स्थानकात या घटने संदर्भात तपास कुठ पर्यत आला याबाबत जाऊन माहिती घेतली.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, सर्वत्र असे भोंदूबाबा चेकाळले असून ज्या कोणी अशा भोंदूबाबा पासून पीडित असेल त्यांनी पुढे यावे त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आव्हान चित्रा वाघ यांनी केले आहे. तरी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून अशाप्रकारे भोंदू बाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून भोंदूबाबांना कायद्याचा धाक राहिला नसून महाराष्ट्र कुठे चालला आहे आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
The Kashmir Files च्या शूटिंगदरम्यान काढण्यात आला होता फतवा; निर्मात्यांनी सांगितला धक्कादायक अनुभव
रणजी ट्रॉफी: धावांचा पाऊस! झारखंडने एकाच डावात ८८० धावा करत मोडला ३२ वर्ष जुना विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

