Share

माजी आमदार विजय भांबळे कोरोनाबाधित

Published On: 

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजय भांबळे हे आरटीपीसीआर चाचणीतून कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, भांबळे यांनी सोशल मिडियातून दिलेल्या संदेशातून आपण शासनाने सांगितलेल्या नियमांचं पालन केले. वर्षभर मास्क घालूनच लोकांच्या भेटी घेतल्या व नियम पाळूनच काही ठराविक कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

इतकेच काय तर माझ्या मुलीच्या लग्नात सुद्धा मी मास्क बाजूला केलं नाही. परंतु मागील 2-3 दिवसात माझ्याकडून अनावधानाने या गोष्टींपासून दुर्लक्ष झाले असावे. कोरोनाचे लक्षण जाणवल्याने टेस्ट केली. दरम्यान रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या माझी तब्येत स्थिर आहे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम कॉरंटाईन आहे. तरी मला कोणीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, जे सहकारी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया कोरोना चाचणी करून घ्यावी. राज्यावरच कोरोनाच संकट आजही दूर झालेले नाही.

त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. तसेच जे व्यक्ती कोरोनाची लस घेण्यास पात्र असतील त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे. आपलं कुटुंब सुरक्षित करावे. आपल्या आशीर्वादाने मी निश्चितपणे पूर्णपणे बरा होईल व आपल्या सेवेत लवकरच रुजू होईल, असे सोशल मिडीया दिलेल्या माहिती वरुन समोर आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!