Share

ऑटोकार पुरस्कार सोहळ्यात महिंद्राची ‘ही’ गाडी ठरली ‘कार ऑफ द ईयर’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत.

या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच केली आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या ऑटोकार पुरस्कार सोहळ्यात महिंद्राच्या नव्या थार या एसयूव्हीने ‘कार ऑफ द ईयर’ हा बहुमान पटकावला आहे. याशिवाय ‘मिड साईज एसयूव्ही ऑफ द ईयर’ हा पुरस्कारदेखील थारला मिळाला आहे. ऑटोकार इंडियाचे सोराबजी यांच्या हस्ते महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे एमडी डॉ. पवन गोयंका यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अमृत महोत्सवानिमित्त 2 ऑक्टोबर 2020 ला कंपनीने थार नव्या स्वरूपात बाजारात दाखल केली होती. पहिल्याच महिन्यात 20 हजार थारचे रेकॉर्डब्रेक बुकिंग झाले होते. आतापर्यंत थारचे 47 हजार युनिटचे बुकिंग झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!