Share

तात्या मामा ऐका जरा…बर्ड फ्लूला घाबरून जाऊ नका; १४ वर्षांपूर्वीचं गाणं पुन्हा चर्चेत

Published On: 

मुंबई :  विविध पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याच्या चर्चेने मागील काही दिवसांमध्ये कोंबड्यांच्या मागणीतही घट होत आहे. देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारने त्या संदर्भातील उपाययोजना सुरु केल्या आहेत.

तर, कोरोनापाठोपाठ हे दुसरे संकट ओढवण्याच्या शक्यतेने कुक्कुटपालन करणाऱ्यांमध्ये व्यवसायात नुकसान सोसण्याची भिती पसरली आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात खरेदीदार ते खाणारे ही साखळीच तुटली होती. परिणामी मांसाहार करणाऱ्यांकडून कोंबड्या, चिकनची मागणी एकदम घटली. कोरोनाकाळात अक्षरश खड्डा करून कोंबड्यांना पुरावे लागले होते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कोरोना काळात चिकनचा दरही २० ते ३० रुपये किलोपर्यंत घसरलेला होता. परिणामत व्यवसायावर पाणी फेरले गेले होते.

आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूच्या भीतीने खवय्यांनी कोंबडी वा अंडी टाळल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी 14 वर्षांपूर्वी केलेल्या ‘बर्ड फ्ल्यू’ गाण्याची आठवण काढून एक फेसबुक पोस्ट देखील शेअर केली आहे.

महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट –

तात्या मामा ऐका जरा..

नैसर्गिक संकटामुळे हतबल झालेला शेतकरी आणि अचानक उद्भवलेल्या बर्ड फ्ल्यूमुळे शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री उद्योग उपजिविकेसाठी आधार असणाऱ्या अनेकांना डोळ्या पुढे अंधार दिसत आहे. 2006 मध्ये बर्ड फ्ल्यूने थैमान घातलं होतं. तेव्हा शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले होते. अश्यावेळी डोक्यात एक कल्पना आली की बर्ड फ्ल्यू बद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे. माझी कल्पना निळूभाऊ फुले यांना सांगितली आणि मी एक गाणं लिहिलं. गाण्यात सहभागी होण्यासाठी माझ्या एका शब्दावर निळूभाऊ फुले, कुलदीप पवार, वर्षा उसगावकर, आशा काळे आणि मिलिंद गवळी या कलाकारांनी होकार दिला.

एका दिवसात पुण्याजवळील एका गावात शुटींग केलं. जेव्हा हे गाणं टीव्ही चॅनेल, दूरदर्शन वर सगळीकडे दिसू लागलं, तेव्हा ह्या गाण्यामुळे खूप मोठा परिणाम झाला. त्यावेळी 2006 मध्ये आजच्या सारखा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत नव्हता की व्हॉट्सॲप हा प्रकारही अस्तित्वात नव्हता. पण ह्या गाण्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना खूप फायदा झाला. अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये आमच्या गाण्यात सहभागी असलेले निळूभाऊ, मी जमलेल्या लोकांसमोर चिकन खाऊन दाखवायचो त्याचा आणि आम्ही केलेलं गाणं लोकप्रिय झाल्यामुळे लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि पुन्हा अंडी चिकनचे भाव वाढले. आपल्याकडून खारीचा वाटा म्हणून काहीतरी मदत झाली याचा आनंद आजही आहे. 14 वर्षांपूर्वी केलेलं बर्ड फ्ल्यू गाणं आज पुन्हा उद्भवलेल्या बर्ड फ्ल्यूच्या संकटात पुन्हा एकदा जनजागृती करेल अशी आशा आहे, अशी फेसबुक पोस्ट निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी लिहिली आहे.

https://www.facebook.com/mahesh.tilekar.5/videos/1922264887914736/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!