Share

महावितरणने कापली वीज; विद्यार्थी अंधारात

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा गेली ९ महिने बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र चिकलठाणा येथील महापालिका शाळेची वीज कापल्यामुळे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या शाळेत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. शाळेत वीज नसल्यामुळे दहावी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याचे काम देखील खोळंबले आहे.

पालिकेच्या चिकलठाणा येथील शाळेकडे महावितरणचे २७ हजार रुपयांचे वीजबील थकलेले आहेत. त्यामुळे महावितरणने ६ जानेवारी रोजी थेट शाळेची वीज कापल्याचा प्रकार समोर आला. शाळेतील मुख्याध्यापकांनी यासंबंधी पालिका शिक्षणाधिकारी तसेच लेखा विभागाला चार दिवस पूर्वीच पत्राद्वारे कळविले आहे.  मात्र अद्यापही ही पालिकेकडून शाळेतील थकित बिल भरण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे येथील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना अंधारलेल्या खोल्यांतच आपले प्रशिक्षण व शिक्षण घ्यावे लागत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आठवीपर्यंतच्या शाळा बंद आहे. मात्र ४ जानेवारीपासूनच शहरांतर्गत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. दोन्ही वर्ग मिळून चिकलठाणा शाळेत विद्यार्थी संख्या 90 आहे. वीज नसल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी संख्या आणखी घटली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या शाळेत दहा वर्ग खोल्या आहेत. दोन संगणक रूम आहेत. तसेच संपूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरेही आहे. मात्र वीज नसल्यामुळे कमरे देखील बंद असून अशावेळी एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळा बंद तरीही वीजबिल २७ हजार
पालिकेअंतर्गत शहरातील नववी, दहावीच्या वर्गात जानेवारीपासून शिक्षण सुरू झाले आहेत. तत्पूर्वी चिकलठाणा शाळा देखील बंद होती. तरीही नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांचे मिळून तब्बल २७ हजार रुपये विजबिल महावितरणकडून शाळेला आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!