मुंबई : नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला. या कायद्यांमुळे निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.
दरम्यान, या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय कोर्टानं घेतला आहे. पुढचे आदेश येईपर्यंत ही स्थिगिती असेल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठीच्या समितीत बी. एस. मान, प्रमोद कुमार जोशी, अशोक गुलाटी आणि अनिल घनवट यांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना तूर्तास स्थगिती दिली असली तरी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन हे सुरु ठेवले आहे. हे कायदे कायमचेच रद्द करावेत या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी, ‘जर केंद्र सरकारच्या दबावाला बळी पडून राज्य सरकारने महाराष्ट्रात हे कायदे लागू केले तर दिल्लीपेक्षा मोठं आंदोलन महाराष्ट्रात करू,’ असा आक्रमक इशाराच दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, ‘केंद्र सरकार हे उद्योगपती व कॉर्पोरेट हाऊसेसचं दलाल असल्यासारखं वागायला लागलं आहे. आम्ही कधीच मागणी केलेली नसताना आमच्यावर हे कायदे लादले जात आहेत. ऊसाच्या एफआरपीप्रमाणेच इतर शेती उत्पादनांवर देखील हमीभाव कायदेशीर करा अशी आमची मागणी आहे. हे तीन कायदे आणून शेतकऱ्यांना गुलाम करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे.’
‘राज्य सरकारने महाराष्ट्रात या कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे म्हणून आम्ही शांत आहोत. ज्यादिवशी केंद्र सरकारच्या दबावाखाली राज्य सरकार या कायद्यांच्या अंमलबजावणीचा प्रयत्न करेल त्यावेळी दिल्लीप्रेक्षा मोठा भडका महाराष्ट्रात उडल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशाराच राजू शेट्टी यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांबाबदल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सूचक विधान !
- महावितरणने कापली वीज; विद्यार्थी अंधारात
- ‘नमस्ते संभाजीनगर’चे बोर्ड काढले, भाजपचे निर्दशने
- हनीट्रॅप : ‘मुंडेंना मी ओळखतही नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा प्रश्नच नाही’
- कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर जर साईड इफेक्ट झाला तर चक्क कंपनी करणार नुकसान भरपाई !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
