🕒 1 min read
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
तर, भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याच महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्याला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. हेगडे यांना त्यांच्या एका मित्राने वेळीच सावध केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सावध करणाऱ्या मित्राचं नाव जाहीर केलं आहे. मनसेचे नेते मनीष धुरी यांनी आपल्याला सावध केल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, मनीष धुरी यांनी देखील आता दुजोरा दिला आहे.
‘२००८ सालात मी वेळीच सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता’ असं मनीष धुरी यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. २००८-९ च्या सालात रेणू शर्मा या महिलेने माझा नंबर मिळवून माझ्याशी संपर्क केला. नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षाचा विभाग अध्यक्ष असल्याने नागरिक संपर्क करतात असा माझा समज होता. मात्र, या महिलेने माझ्याशी चुकीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी वेळीच सावध झालो होतो.’ असा खुलासा मनीष धुरी यांनी दिला होता.
यानंतर, ‘कृष्णा हेगडे, मनीष धुरी हे दोघे धनंजय मुंडे यांना राजकीय मित्र म्हणून मदत करत असतील. परंतु मी कृष्णा हेगडेंचा आदर करते, ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही. मी मनिष धुरी यांना माझ्या अडकलेल्या अल्बम संदर्भात भेटले होते. त्यानंतर ते मला दारु पिऊन कॉल करायचे’ असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता.
आता मनीष धुरी यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘रेणू शर्मा या तरुणीच्या आरोपाला मी भीक घालत नाही. येत्या काळात मी सगळे कॉल डिटेल्स सुध्दा सर्वांसमोर ठेवणार आहे. धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही. त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही,’ असं प्रत्युत्तर धुरी यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांबाबदल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सूचक विधान !
- रोहित शर्माच्या विकेटनंतर जोरदार टीका; रोहितने दिलं प्रत्युत्तर, म्हणाला…
- शेतक-यांना मन की बात नाही तर काम की बात पाहिजे- यशोमती ठाकूर
- पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींचे गुलाम; थोरातांची विखारी टीका
- कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर जर साईड इफेक्ट झाला तर चक्क कंपनी करणार नुकसान भरपाई !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
