Share

‘नमस्ते संभाजीनगर’चे बोर्ड काढले, भाजपचे निर्दशने

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शनिवारी भाजपतर्फे शहरात अनेक ठिकाणी ‘नमस्ते संभाजीनगर’ या नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने टीव्ही सेंटर चौकासह सर्व ठिकाणी भाजपने लावलेले फलक काढून घेतले. फलक काढू नयेत म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिकार केला. मात्र मनपाने त्यांचे ऐकून घेतले नाही. या कारवाईच्या निषेधार्थ दुपारी टीव्ही सेंटर चौकातच भाजपकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.

भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करा, ही मागणी उचलून धरली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेला खिंडित गाठण्यासाठी भाजपने संभाजीनगरचा मुद्दा ताणून धरला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याने ही संधी साधून भाजयुमो तर्फे शुक्रवारी रात्री टीव्ही सेंटर चौकात सुपर संभाजीनगर बोर्डासमोरच नमस्ते संभाजीनगरचा बोर्ड लावला होता. तो पालिका प्रशासनाने सकाळीच कारवाई करीत हटविला. त्यामुळे भाजपचे नेते, कार्यकर्ते चांगलेच संतापले.

दुपारी एक वाजता टीव्ही सेंटर चौकातच भाजपने बॅनर काढल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी भाजपच्या आंदोलनाला परवानगी नाकारली तरीही भाजपचे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे टीव्ही सेंटर चौकात तणाव निर्माण झाला. टीव्ही सेंटर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने केली. खासदार डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!