🕒 1 min read
मुंबई : काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या भेटी दरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर येताच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली. आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे या पक्षांची युती होणार, असा अंदाज वर्तवला जाऊ लागला. त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया देत काही नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.
“एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. मात्र शिंदे गटातील आमदार नेमक्या कोणत्या पक्षाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण हे आमदार भाजपमध्ये जायला तयार नाही, प्रहारमध्ये जाण्याची परिस्थिती राहिलेली नाही. सुप्रीम कोर्टात घटनापीठाची मंजुरी झाली आहे, त्याचे गठन लवकरच होणार आहे. त्यानंतर कायदेशीर लढाईला सुरवात होणार आहे आणि त्यानंतरच या सरकारची वैधता ठरणार आहे. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याकडे का गेले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हे 40 आमदार मनसेत जातील का? एक आमदार असलेला पक्ष या 40 आमदारांचा मालक होईल का ? अशा चर्चा सुरू आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Aditya Thackeray : “युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता…”, आदित्य ठाकरेंचे आवाहन
- Draupadi Murmu : “अवघ्या 15 मिनिटांपूर्वी मोदींनी फोन करून…”, द्रौपदी मुर्मू यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
- Sanjay Raut : “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस…”, असंसदीय शब्दांच्या यादीवरुन संजय राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
