Share

Aditya Thackeray : “युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता…”, आदित्य ठाकरेंचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असताना युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray यांनी युवा सैनिकांना आवाहन केले आहे.

युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा. सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”. असे ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी आवाहन करत शिंदे सरकारला चांगलाच टोलाही हाणला आहे.

दरम्यान पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज असून  कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!