Share

Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका

Published On: 

मुंबई: माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप असल्यास परत सर्वेक्षण करण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेलाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“ज्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे नाही, ते आता बुद्धीभेद करीत आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणात अडथळे आणण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता त्यावर आक्षेप घेत आहेत. यासंदर्भात अन्य कुठलाही अभ्यास करायचा असेल तर आमचे सरकार त्यासाठी तयार आहे.”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान बांठिया आयोगाने राज्यात ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणानंतर काढला असून हा अहवाल राज्य सरकारने फेटाळून लावावा, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. दरम्यान बांठिया आयोगाचा अहवाल ओबीसींच्या राजकीय आरक्षणापुरता असून त्यांना २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याची शिफारस आयोगाने केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!