पुणे – राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती काहीअंशी नियंत्रणात आली असल्याचे चित्र असले तरीही अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. अजूनदेखील काही ठिकाणी अतिशय बिकट परीस्थिती असल्याचे समोर येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अजूनही काही ठिकाणी बेड,ऑक्सिजन इत्यादी मिळत नसल्याचे चित्र आहे.
कोरोना काळात अचानक रुग्णांची संख्या वाढली आणि मग ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमधील ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना रुग्णालयांमध्ये औद्योगिक कंपनींमधील सुमारे 80 टक्के वापरला जात होता. सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचले.
आता कोविडमुळे बिकट बनलेली परिस्थिती आता काहीशी सुधारू लागताच आता म्युकर मायकोसिसने डोके वर काढले आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना कंपन्यांना ऑक्सिजन कसा मिळेल यासाठी राजकीय नेते प्रयत्न करताना दिसून येत आहेत.कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे अशी कारणे देवून या औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच यासंदर्भात मागणी केली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांना मागणीचे तसे निवेदन दिले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना हॉस्पिटलसाठी प्रामुख्याने 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कंपन्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनवर मर्यादा आणली होती. परंतु, आता पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत आहे,त्यामुळे या औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करावा असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लांडगे यांना परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे वाटत असले तरीही पुणे जिल्ह्यातील आजही कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोना रुग्णांचा मृत्यूदर लक्षणीय आहे. अशा वेळी इतर उपचारांच्या सोबतच ऑक्सिजनचा पुरवठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. याशिवाय निर्बंध जेव्हा शिथिल केले जातील तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू शकेल अशी देखील शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांच्या जीवाला देखील धोका उद्भवू शकतो.
कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा झालाच पाहिजे याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही मात्र हा पुरवठा थोड्या उशिराने केला तर फक्त आर्थिक नुकसान होऊ शेकल मात्र ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचा जीव जाणे परवडणारे नाही. दरम्यान, आता प्रशासन लांडगे यांच्या मागणीवर नेमका काय निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
- ‘..तरीही मोदींनी संभाजीराजेंना भेट द्यायलाच हवी’, राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

