Share

महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, मॉर्गनला दंड बसल्यानं पीटरसन खूश, म्हणाला…

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 15 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)ने सामना गमावला. या संघाने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना 18 धावांनी गमावला आणि त्यानंतर कर्णधार इयन मॉर्गनला दंड ठोठावण्यात आला. मॉर्गनची टीम चेन्नईविरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरली.

नियमानुसार, ‘आयपीएलच्या आचारसंहिते अंतर्गत कमीतकमी ओव्हर स्पीड गुन्ह्याशी संबंधित संघाचा हा पहिला गुन्हा आहे, म्हणून मॉर्गनला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात स्लो ओव्हरसाठी दंड भरणारा मॉर्गन हा तिसरा कर्णधार आहे. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 12 लाख रुपये दंड ठोठावला गेला.

या निर्णयावर इंग्लंजचा माजी बॅट्समन केव्हिन पीटरसन खूश आहे. ”रोहित शर्मा आणि इयन मॉर्गन यांना प्रत्येकी 12 लाखांचा दंड झाला आहे. हा सर्व खेळाडूंसाठी चांगला संदेश आहे. टी 20 हे एक मनोरंजन पॅकेज आहे. यामध्ये फोर, सिक्स, विकेट, खराब फिल्डिंग या सर्वांना जागा आहे, पण संथपणाला नाही. प्रेक्षकांना सारं काही तीन तासांमध्ये हवं असतं.” असं पीटरसननं ‘बेटवे डॉट कॉम’साठी लिहलेल्या ब्लॉगमध्ये लिहलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!