नांदेड : कोरोना संसर्गाचा वाढता कहर लक्षात घेता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने विद्यापीठ तसेच परिसर, सर्व इमारतीमध्ये अभ्यागतांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
विद्यापीठामधील कार्यालयात तसेच प्रतिनिधी पाठवू नये, अश्या कडक सुचना देखील विद्यापीठाचे कुलसचिव यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या अख्यारितील चार जिल्हे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना दिल्या आहेत. या बरोबर विद्यापीठाच्या परिसरामधील सर्व महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संकुले, प्रशासकीय विभाग, ग्रंथालये यांना दिले आहेत. राज्य सरकारने २१ एप्रिलच्या आदेशानुसार २२ एप्रिलपासून रात्री ८ ते १ मेपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत विविध मार्गदर्शक सुचना देखील दिल्या आहेत.
या नियमानुसार सर्व शासकीय कार्यालयामधील अत्यावश्यक सेवा वगळता एकुण लोकसंख्येच्या १५ टक्के तसेच ५ व्यक्ती पैकी जे जास्त असेल ते अनिवार्य करण्यात आले आहे. या बाबतीच्या सर्व महत्वपूर्ण सुचना विद्यापीठाच्या कुलसचिवांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. त्यामध्ये कोरोना बाबतच्या सर्व शासकीय नियमानुसार आदेश, निर्देश, नियम देखील विद्यापीठाने जारी केले आहेत. या वेळी विद्यापीठ तसेच परिसरातील शैक्षणिक संकुले, प्रशासकीय संकुले, उपपरिसर लातूर, परभणी तसेच न्यु मॉडेल डिग्री महाविद्यालय हिंगाेली, कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व शंशोधन केंद्र किनवट तसेच इतर ठिकाणचे उत्तमराव राठोड आदिवासी विकास व सशोधन, शैक्षणिक, प्रशासकीय विभागांना देखील दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

