मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यात अनेक मान्यवरांना कोरोनाची लागण झाली होती. सरकार परिस्थिती गंभीररीत्या हाताळत असुन या विषाणुशी लढा देत आहे. अनेक शहरात स्मशानभूमी समोर अंतिम संस्कारासाठी मृतदेहांच्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच ऑक्सिजन, बेड आणि औषधांचा तुटवडा तिव्रतेने जाणवत आहे. भासू लागला आहे.
या संकटाच्या काळात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा पुढे आला आहे. अक्षयने यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीचा खासदार गौतम गंभिर याची संस्था ‘गौतम गंभीर फाउंडेशन ‘ या संस्थेला एक कोटी रुपयांची मदत करण्याचे वचन दिले आहे. गंभीरने ट्विट करत अक्षयचे आभार मानले आहे, तो म्हणाला ‘सध्या या परिस्थीतीत अक्षयची मदत ही एक आशेचा किरण बनुन आली आहे. मी अक्षय कुमारचे आभार मानतो.’ असे ट्विट केले आहे.
Every help in this gloom comes as a ray of hope. Thanks a lot @akshaykumar for committing Rs 1 crore to #GGF for food, meds and oxygen for the needy! God bless ???????? #InThisTogether @ggf_india
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 24, 2021
अक्षय कुमारने दिलेली ही रक्कम गरजूंच्या जेवणासाठी, औषधांसाठी आणि ऑक्सिजनसाठी वापरले जाणार आहेत. अक्षय कुमारचा पुढाकार बघुन इतर कलाकारही पुढे येत मदत करतील अशी अपेक्षा गौतम गंभीर याने व्यक्त केली आहे. सध्या देशात ऑक्सिजन एक्सप्रेस ही रेल्वे काही भागात ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’


