मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात याबाबत विधान केल्यानंतर आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील राज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत असल्याचे भाष्य केले आहे. राज्य सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम घेणार असून यासाठी ग्लोबल टेंडर काढून १५ कोटी लसींची व्यवस्था करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील यासाठी होकार आहे. लवकरच हे टेंडर काढलं जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘बदल्यांतून कमावलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरू करा’, खा.विखेंचा थोरातांना टोला
- शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मेहबूब शेख यांच्या तक्रारीवरून २७ जणांवर गुन्हा
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

