Share

उस्मानाबादेत मृतांच्या आकडेवारीत तफावत,कोविड सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव!

Published On: 

उस्मानाबाद: कोरोनामुळे मृत्युंचा संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन कोरोना मृत्यू झाल्याची आकडेवारी लपवत आहे का असा प्रश्न उमरगा तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. कारण उमरगात एप्रिल महिन्यात तब्बल ७४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद पालिकेत आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील नोंदीत ३६ जणांचा मृत्यू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मृत्यूच्या नोंदीत तफावत असल्याचे दिसून आले आहे.

एकिकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढता आकडा आरोग्य प्रशासन यात दिवस रात्र रुग्णांना सेवा करत आहे तर दुसरी कडे ऑक्सिजन, रेमडिसेविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे असे असताना कोरोना रुग्णांना वाऱ्यावर सोडुन जात आहे का असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक विचारत आहे तसेच आरोग्य प्रशासन आणि सर्व यंत्रणेवर नियंत्रण असणाऱ्या महसूल प्रशासनाचे याकडे लक्ष असायला हवे. तालुक्यात मागील तीन महिन्यापासून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी सकाळी अँटिजेन चाचणीत ८८, स्वॅबचे सर्वच अहवालात निगेटिव्ह आल्याने एका दिवसात ८८ जण पॉझिटिव्ह आले आढळले.

दरम्यान,कोरोना रुग्णांचा मृत्युची नोद बालाजीनगर, नारंगवाडी, बेळंब, मुळज, गदलेगाव, तुरोरी, गुंजोटी, रामपूर, अचलेर, कांबळेवाडी येथे प्रत्येकी एक अशा दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात ३९२६ पॉझिटिव्ह आले असून, त्यामध्ये शहरात १७१८, ग्रामीण भागात सर्वाधिक २२०८ पॉझिटिव्ह आले आहेत. ३२४६ कोरोना मुक्त झाले असून १३५ मृत्यू झाल्याने सद्यःस्थितीत ५४५ रुग्ण उपचारात आहेत. कोविड उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग, मुरूम ग्रामीण रुग्णालयामार्फत घेण्यात आलेल्या १५ हजार ०५७ रॅपिड अँटिजेन चाचणीत १९९५ पॉझिटिव्ह आले आहेत.तसेच शुक्रवारी ३४ स्वॅब अहवाल तपासणीस पाठवण्यात आले असून शनिवारी रात्रीपर्यंत अहवाल प्राप्त होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!