Share

महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक घालून व गरजूंना दूध वाटप करून आंदोलन संपन्न

Published On: 

मोहोळ- भारतीय जनता पार्टी व रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून उपसरपंच शेखर चोरमुले व  विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली.

महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करत दुधाची नासाडी न करता गरजूंना दूध वाटून आंदोलन संपन्न झाले. दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले पाहिजे. माहाविकास आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा इरादा केला आहे का? या सरकारच्या काळात पाणी 25 रुपये लिटर आहे मात्र दूध 17-19 रुपये लिटर आहे ही विदारक परिस्थिती आज राज्यात आहे, येणाऱ्या काळात तातडीने जर सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाही तर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा आंदोलकांनी यांनी यावेळी दिला.

यावेळी उपसरपंच शेखर चोरमुले, सिद्धेश्वर पवार, अनिल गावडे, भीमराव वाघमारे, नवनाथ वाघमारे, बजरंग माणके, नामदेव वाघमारे, नितीन पाटील आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

…तोपर्यंत मी कोरोनाची लस घेणार नाही, राजीव बजाज याचं मोठ विधान

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्या, सुनील केदारांचे आदेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!