Share

…तोपर्यंत मी कोरोनाची लस घेणार नाही, राजीव बजाज यांचं मोठ विधान

Published On: 

मुंबई : दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत, वडगाव बुद्रुक पासून वॉशिंगटन पर्यंत सगळे जण एकच प्रश्न विचारात आहेत की कोरोनावर लस कधी येणार. आता याच कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर जगभरातील काही कंपन्या लस तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण या लसीची आतुरतेने वाट पाहत आहे.

दुसरीकडे, भारताचे प्रसिद्ध बिझनेसमन आणि बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी याबद्दल एक मोठे विधान केले आहे. जोपर्यंत सरकार कोरोना लस अनिवार्य करत नाही, तोपर्यंत ही लस घेणार नाही. कारण, ही एक नवीन लस असून ती घाईघाईने बनविली जात आहे, असे विधान राजीव बजाज यांनी केले आहे.

‘लॉकडाऊन हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो’

राजीव बजाज यांनी यासंदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यावेळी, जी लस नवीन आहे आणि जी घाईघाईने तयार केली गेली आहे. जी मी घेईन, ती सर्वात शेवटची गोष्ट असेल. तसेच, होमिओपॅथी, योग आणि सोशल डिस्टंसिंगवर अधिक विश्वास ठेवून त्यांचे पालन करणार असल्याचे राजीव बजाज यांनी सांगितले. याचबरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी आणि प्रसंगी लॉकडाऊन करण्याऐवजी सरकारने २० ते ६० वर्षांच्या निरोगी लोकांना सामान्यपणे त्यांचे काम करण्यास परवानगी दिली पाहिजे, असेही राजीव बजाज म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील १६ लाख ३८ हजार ८७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५ लाख ४५ हजार ३१८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १० लाख ५७हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

पावसात भाषण कधी करायचं, हे रावसाहेब दानवेंना अजून कळणार नाही – जयंत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!