मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. काही काळानंतर विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होती. तसे त्यांनी परीक्षे संबंधित मार्गदर्शक नियमावली देखील जाहीर केली. याच विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाला युवा सेनेसह काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल होत. या याचिकांवर आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयानं याचिकांवरील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
Supreme Court adjourns for August 10 the hearing of pleas challenging University Grants Commission's (UGC) July 6 circular and seeking cancellation of final term examination in the wake of COVID-19 pandemic. pic.twitter.com/AcU635JCUZ
— ANI (@ANI) July 31, 2020
यापूर्वी, याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने आपली भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात दाखल केले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका मांडताना त्याची कारणेही स्पष्ट करण्यात आली होती.
काय म्हटलं प्रतिज्ञापत्रात :
“विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्याचवेळी त्यांचे शैक्षणिक भवितव्य, करिअर, जगभरातील संधी या सर्व बाबी लक्षात घेऊनच परीक्षेचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी परीक्षेचे पर्यायही देण्यात आले आहेत. तसेच एखादा विद्यार्थी काही कारणास्तव परीक्षा देऊ शकला नाही, तर त्याला विशेष बाब म्हणून परीक्षा देण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय मनमानीने घेण्यात आल्याच्या याचिकाकर्त्यांचा दावा चुकीचा आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे”.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने काही विद्यापीठे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारांनी यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. तसेच यावर्षी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची योजना आखली होती. मात्र आता हा वाद न्यायालयात गेला आहे, आणि न्यायालयानं या याचिकांवरील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे याचिकांवर आता १० ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे.
नवे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते?
शैक्षणिक ‘जगबुडी’पासून संजय राऊत आता तुम्हीच वाचवा, शेलारांची खोचक टीका
युजीसी’ने आधीचा निर्णय फिरवला; परीक्षांबाबतचे निर्णय हे कुलगुरूंच्या सहमतीनेच – सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

