Share

‘महावितरण’ची वीज महागणार, वीजदरवाढीचा प्रस्ताव

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महावितरणने 20 टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे (MERC) सादर केला आहे. वार्षिक तोटा भरुन काढण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ने ५९२७ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे.

तसेच राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीने 5927 कोटी रुपये वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर सर्वसामान्यांना वीजदरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एप्रिल 2020 पासून 5.80 टक्क्यांनी वीजदर वाढणार आहे.

याचप्रमाणे राज्यात सध्या 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांचा वीजदर हा प्रतियुनिट 3.05 रुपये आहे. हा वीजदर प्रतियुनिट 3.30 रुपयांपर्यंत करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे प्रतियुनिट तब्बल 25 पैशांनी वीज महागणार आहे. तसेच सध्याच्या वीजदरातून महावितरणला ७६ हजार ९९८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. नवीन वीजदर लागू झाल्यानंतर ८२ हजार ९२५ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असून ही दरवाढ ५९२७ कोटी रुपयांची म्हणजेच सरासरी ५.८० टक्के असेल.

दरम्यान, राज्यातील सुमारे दोन कोटी ५५ लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार असून दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर हा ८ टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!