परभणी : बियाणे – खत शेतकऱ्यांच्या बांधावर मिळतील अशी घोषणा महाविकासआघाडी सरकारने केली होती.परंतु ती केली घोषणाच राहिली. या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घोषणा न राहता शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे पोहचवण्याचे काम करावे असे आवाहन जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी शनिवारी केले.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२१ पूर्व तयारी आढावा बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बि – बियाणे हे आता लॉकडाऊन तसेच कोरोनाचा संसर्गाचा वाढता कहर तसेच संचारबंदी देखील असल्यामुळे आता शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करण्यासाठी बि – बियाणे कसे काय करेदी करणार असा प्रश्न सामान्य शेतकरी वर्गाला पडलेला आहे. तर महाविकास आघाडीने सर्व शेतकऱ्यांना बांधावर बि – बियाणे देण्याचे घोषीत केले होते. परंतू अद्यापही तसे होताना दिसत नाही. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना बांधावर बि – बियाणे द्यावे जेणे करुन शेतकऱ्यांशी सोय होवू शकेल.
गावामध्ये महिला बचत गटामार्फत बियाणे व खत वाटप करण्यात यावे.त्याचबरोबर खतांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदार घ्यावी.आणि मागील वर्षी बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली अशा किती शेतकऱ्यांना मदत मिळाली व किती कंपण्यांवर कारवाई केली .इ.मुद्दे उपस्थीत केले.
— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) May 1, 2021
महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताना शेतकऱ्यांना बांधावर बि – बियाणे देणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. परंतू आज सरकारला दीड वर्ष झाले आहे. परंतू अजुन या बाबत कोणत्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला नाही. तसेच या बाबतचा ठोस शासकीय निर्णय देखील घेण्यात आलेला दिसून येत नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी, कोराेना माहामारीच्या पार्श्वभमूीवर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेणे खुप महत्वाचे आहे. असेही या वेळी आमदार मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी सांगितले. शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा
- आरसीबीच्या प्रमुख शिलेदारांना बाद करत हरप्रित ब्रारने रचला ‘हा’ विक्रम
- ‘कोरोनाच्या संकटात सरकार मदत करू शकत नाही,मला आमदार असण्याची लाज वाटतेय’
- लता मंगेशकर यांचे एक पाऊल पुढे ; मुख्यमंत्री सहायता निधीला केली 7 लाखांची मदत
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अचानक शीसगंज साहेब गुरुद्वाराला भेट


