Share

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी नियम बदलणार

Published On: 

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. आता हा मुद्दा आगामी अधिवेशनात हा मुद्दा निकालात काढण्याची राज्य सरकारने तयारी सुरु केली असल्याचे दिसून येत आहे. भाजप देखील ही निवडणूक घेण्यासाठी उत्सुक असल्याने महाविकास आघाडी सरकारला बहुमत असून देखील धडकी भरली आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर व्हावी अशी मागणी काँग्रेसची आहे तर या निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे. हाच दगाफटका टाळण्यासाठी महाविकासआघाडी थेट नियमांमध्ये बदल करू पाहत आहे. त्यामुळे गुप्त मतदानऐवजी आवाजी पद्धतीने मतदान करण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.ही निवडणूक घेण्याच्या आधीच नियमात बदल करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीचा आहे.

विरोधी पक्ष आमदारांना फितूर करू शकतात या भीतीने गुप्त मतदान करण्याएवजी आवाजी पद्धतीने मतदान करण्याचा प्रस्ताव महाविकासआघाडी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीने तयार करून तो सभागृहात पाठवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.हा प्रस्ताव संमत करायचा असेल तर सभागृहातही बहुमताची गरज आहे आणि ते बहुमत महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे नियम बदलण्याच्या अगोदर महाविकास आघाडीला सभागृहात या प्रस्तावावर बहुमत सिद्ध करावा लागेल.

दरम्यान, आतापर्यंत ज्या प्रथा आणि परंपरा विधिमंडळाच्या चालत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक झाली पाहिजे. भारतीय घटनेनुसार ही निवडणूक गोपनीय झाली पाहिजे. नाहीतर आम्ही या निवडणुकीला विरोध करू असं महाविकास आघाडीचे मित्रपक्षांनी इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!