मुंबई : शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस वर टीका केल्यानंतर या विधानाने राजकीय वातावरण तापून निघाले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गीते यांचे हे विधान सत्य परिस्थितीवर अधारीत आहे. आघाडी अनैसर्गिक आहे हे मी पहिल्यापासून सांगतोय. असे फडणवीस म्हणाले.
शिवसेना नेते अनंत गीते आघाडी सरकारवर टीका करताना म्हणाले, राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार आमचे नेते नाहीत. महाविकास आघाडी हि केवळ सत्तेसाठी तडजोड आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केली होती. या विधानाला उद्देशून भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे मी पहिल्यापासून सांगतोय की तीन पक्षांची झालेली आघाडी ही अनैसर्गिक आहे. अशा प्रकारची आघाडी कधी चालू शकत नाही. असे फडणवीस म्हणाले होते.
यापूर्वी भजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याची आणि मंत्र्याची नार्को टेस्ट करा, त्यावेळी त्यांच्यातून एकच आवाज येईल, ही युती नकोच, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे राजकीय आत्महत्या आहे, अनंत गीते हे मनापासून बोलत होते. असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
- ‘महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकत नाही, तुम्ही काय आमचं नेतृत्व करणार?’
- हिरवे लाडू खाणारे सरकार हिंदूंवर गुन्हा दाखल करते, तर महेबूब शेखला वाऱ्यावर सोडते, मनसेला हल्ला
- महाराष्ट्र पुन्हा हादरला! अमरावतीमधील गर्भवती अत्याचार पीडितेची गळफास घेत आत्महत्या
- राज्यसरकार महिला सुरक्षा विषयात अपयशी, राज्याची परिस्थिती चिंताजनक – अभाविप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

