टीम महाराष्ट्र देशा – औरंगाबाद महानगर पालिकेत महाविकास आघाडीतील कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि एम आय एम समोर आघाडीच तगडा आव्हान असेल.
गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद मध्ये महाविकास आघाडी होणार की नाही याबद्दल संभ्रम होता. परंतु आज तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली असून प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती दानवे यांनी माध्यमांना दिली आहे.
राज्य पातळीवर महाविकास आघाडी झाल्यानंतर राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजून प्रत्यक्ष जागा वाटप झालं नसलं तरी बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षाच्या एकजुटीने औरंगाबादेतील भाजप आणि एम आय एम यांच्यासमोर मोठं आव्हान उभा राहिलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
