🕒 1 min read
औरंगाबाद : येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या अनुषांगणे शहरात मनपा प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत शहरात दररोज ५ हजार चाचण्या केल्या जाणार आहे.
गेल्या मार्च मध्ये शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर जुन पर्यंत पहिल्या लाटेत मोठया प्रमाणावर रूग्ण आढळत होते. यानंतर फेब्रुवारी मध्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. यात पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक रूग्ण आढळत होते. तसेच मृत्युचे प्रमाण देखील वाढले. ऑक्सीजनचा तुटवडा देखील जाणवला. यावेळी शहराचा पॉझिटिव्ह रेट २० टक्क्यांच्या जवळपास पोहचला होता. यामुळे सर्व आरोग्य यंत्रणा चिंतेत होती.
आता कुठे दुसरी लाट ओसरली आहे. त्यातच येत्या काळात तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याअनुषांगणे दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतल्याने प्रशासनाने पहिलेच खबरदारीचा उपाय म्हणून उपाय योजना करून ठेवल्या आहेत. सध्या दररोज २ हजार ६०० चाचण्या केल्या जात आहेत. आता या चाचण्या मध्ये वाढ केली जाणार आहे. ही संख्या दुप्पट करून आता दिवसाला ५ हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. असे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका बालकांना असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे मनपाने बालरोग तज्ञांची बैठक घेतली. तसेच बालकांकरिता ९०० च्या जवळपास बेड उपलब्ध आहेत. यात गरवारे कंपनी कडून चालवण्यात येणारे बाल कोविड सेंटर, मेल्ट्रोन, एम जी एम आदींचा समावेश आहे.
दुसऱ्या लाटेत दररोज ६ हजार चाचण्या : दुसऱ्या लाटे दरम्यान चाचण्यांची संख्या ६ हजरावर गेली होती. आता लाट ओसरल्याने सध्या प्रशासनाकडून दररोज २ हजार ६०० चाचण्या केल्या जात आहेत. परंतु आता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मनपाने यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
