Share

‘बालाजी तांबे यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले’- फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयुर्वेद आणि योग शिक्षणाची जगाला नव्याने ओळख करुन देण्यासाठी आयुष्यभर झटलेले आयुर्वेदाचार्य बालाची तांबे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी जगभरात आयुर्वेद आणि योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले.

बालाजी तांबे यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. बालाजी तांबे यांच्याशी माझा वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे, असं फडणवीस म्हणाले.

तसेच ‘बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि अध्यात्म यावर अतिशय विपुल लेखन केले आहे आणि विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. विशेषत: स्त्रियांच्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे काम केले. योग, संगीतोपचार असे विविध प्रयोग त्यांनी केले. त्यांचे माध्यमांतील लेख वा मुलाखती या विचारप्रवर्तक असायच्या आणि म्हणूनच त्या लोकप्रिय ठरल्या. श्रोत्याला त्या मानसिक समाधान आणि आधार देणार्‍या असायच्या. मी बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेद आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचे काम बालाजी तांबे यांनी केले. या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदीक औषधांवर संशोधन आणि त्यांची निर्मिती देखील केली. तसेच ही औषधी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. जगभरात आयुर्वेदाचा प्रचार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!