🕒 1 min read
मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज सुरु आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललं आहे. परवा एका मंत्र्याने नेत्याने वक्तव्य केलं की, काही जण जेलमध्ये गेले तर काय होतं. बाकी आमदार आहेत मिनिस्टर व्हायला. संवेदनशील मनाला त्रास देणारं असं हे सगळं आहे. तुमची चौकशा, त्या चौकशांमधून अटक होणं याकडे पाहण्याची अशी दृष्टी झाली आहे का? आज समाजात जो जो गुन्हा मानला जातो, चोरी, दरोडा, खून, भ्रष्टाचार, बलात्कार हे सगळे गुन्हे तुमच्या कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी, आमदाराशी जोडले गेले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पंतप्रधान @narendramodiजींच्या दूरदृष्टीमुळे भारताचं स्थान कसं आणि किती बदललं असेल, याचा अनुभव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री @DrBharatippawar यांनी नुकताच सांगितला. मोदीजी, तुमच्या परराष्ट्र धोरणाचंही हे यश मानावं लागेल. अशा पथदर्शी निर्णयांमुळे इतिहास न घडला, तरच नवल ! pic.twitter.com/D67m8vGqgs
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 16, 2021
राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा प्रस्ताव आशिष शेलार मांडणार आहेत. प्रसाद तनपुरे यांच्यावर एका पत्रकाराने आत्महत्या करण्याचा आरोप केला आहे. गेंड्याची कातडी म्हणताना गेंड्यालाही असं वाटेल मला ही थोडी सेन्सिटीवीटी आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कायद्याचं राज्य नव्हे, ‘काय ते द्या’चं राज्य; फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला
- ‘विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होणार’
- एसटीचा संप संपता संपेना; औरंगाबाद विभागात संपकऱ्यांनी केला टाळ-मृदुगांचा गजर!
- पोलिसांचा विरोध तरीही अमरावती दौऱ्यावर किरीट सोमय्या ठाम!
- हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
