🕒 1 min read
मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज सुरु आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही. सध्याचं हे सरकार म्हणजे कायद्याचं राज्य नसून काय ते द्या. फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर शरसंधान साधलं आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे, म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरतं हे सीमित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आणि ज्याप्रकारे सरकार सामान्यांकरता नाही, तर सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही, काय ते द्याचं राज्य आहे. फक्त आम्हाला काय मिळणार? आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होणार’
- एसटीचा संप संपता संपेना; औरंगाबाद विभागात संपकऱ्यांनी केला टाळ-मृदुगांचा गजर!
- पोलिसांचा विरोध तरीही अमरावती दौऱ्यावर किरीट सोमय्या ठाम!
- हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार!
- ‘आम्ही या आरोपांकडे…’, भाजपा प्रभारींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

