मुंबई : काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.
शरद रणपिसे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर होत असलेली निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु, मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचा उमेदवार निश्चितच विजयी होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
राजीव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत्या. काही महिन्यांपुर्वीच महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून प्रज्ञा यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु तेव्हा प्रज्ञा यांच्या ऐवजी रजनी पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान,पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, असे प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले होते. अखेर राहुल गांधी यांनींही सातव कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या विजय देखील निश्चित समजला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटीचा संप संपता संपेना; औरंगाबाद विभागात संपकऱ्यांनी केला टाळ-मृदुगांचा गजर!
- पोलिसांचा विरोध तरीही अमरावती दौऱ्यावर किरीट सोमय्या ठाम!
- हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार!
- ‘आम्ही या आरोपांकडे…’, भाजपा प्रभारींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली…


