Share

सचिन वाझेंमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात ? शरद पवारांनी केलं महत्वाचं विधान

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते महाविकस आघाडीतील विविध नेत्यांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. दरम्यान, आज देखील विविध पोलीस अधिकारी आणि सरकारमधील नेत्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरुच आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आज दिल्लीमधील पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर महत्वाचं भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. पत्रकारांनी वाझेंमुळे सरकार अस्थिर होतंय का ? असा प्रश्न केला असता, ‘एका इन्स्पेक्टरमुळे सरकारवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. वाझे प्रकरणाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही,’ असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!