Share

आयसीसीच्या आगामी ३ स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय इच्छुक

Published On: 

मुंबई : काही दिवसापुर्वी आयसीसीने आगामी काळात होणाऱ्या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या वेळापत्रकानुसार प्रत्येक वर्षी आयसीसीची मोठी स्पर्धा आयोजीत होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध देशांनी इच्छा व्यक्त केली आहे.

आयसीसीने काही दिवसापुर्वी २०२४ ते २०३१ या वर्षात आठ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी १७ देशांनी इच्छा व्यक्त केली आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश आघाडीवर आहे. आयसीसीने घोषणा केलेल्या स्पर्धेपैकी ३ स्पर्धेच्या आयोजन करण्याची इच्छा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. यात दोन टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि एका चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनाची इच्छा व्यक्त केली आहे.

यादरम्यान आयसीसीने २०२३ साली होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आयोजक शोधायला सुरुवात केली आहे. २०२४ आणि २०३१ दरम्यान आयसीसीने ८ एकदिवसीय स्पर्धा आणि टी-२० स्पर्धांची घोषणा केली आहे. आयसीसीच्या या स्पर्धासाठी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, मलेशिया, नामीबिया, न्युझीलंड, ओमान, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रीका, श्रीलंका, वेस्टइंडीज, युएई, अमेरिका आणि झिम्बाब्वे या देशांनी आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!