🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहे.
राज्यातील विविध भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप महिला आघाडीच्यावतीने महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी आ.मोनिका राजळे म्हणाल्या की, राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्य शासन व प्रशासन महिलांचे संरक्षण करू शकत नाही, यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. महाविकास आघाडी सरकारने महिलांकडे तुच्छ नजरेने बघण्याचा दृष्टिकोन सोडून देऊन महिलांच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलावीत.
महाराष्ट्रात ह्या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. कोविडच्या महामारीतही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित मुलीवर अत्याचार होत आहेत. राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन कायदा करण्याचे जाहीर केले होते, मात्र अद्याप निर्णय घेतला नाही.
हे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील नांदूरा, जालना, करंजे विहिरे, रोहा, मुंबई, गोरेगांव, पाबळ, पनवले, कोल्हापुर, औरंगाबाद अशा सर्वच ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडले आहेत, असे आ.राजळे म्हणाल्या.
यावेळी भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार, शहराध्यक्ष ज्योती मंत्री, सभापती सुनीता दौंड, उपसभापती मनीषा वायकर, जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, माजी सभापती चंद्रकला खेडकर, नगरसेविका मंगल कोकाटे, शारदा हंडाळ, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, दत्तू दहिफळे, अजय भंडारी, बाळासाहेब आकोलकर यांच्यासह विविध नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महत्वाच्या बातम्या-
- बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात
- गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- जाणून घ्या राज्यात कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या घटून झाली चार अंकी झाली का ?
- मंदिरे बंद, उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार; मंदिरे उघडण्यासाठी शिर्डीत भाजपच्यावतीने आंदोलन सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
