🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातल्याचे गेल्या काही महिन्यात चित्र पाहायला मिळत होते मात्र आता राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने पॉझिटिव्ह ( १९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख २३ हजार ७९१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
महत्वाच्या बातम्या-
- बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात
- गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- देशात 60 लाख कोविड रुग्ण झाले बरे; अर्ध्याहून अधिक रुग्ण ‘या’ पाच राज्यातले
- ‘वीजपुरवठा खंडीत होणं हे दुर्भाग्यपूर्ण असून महाराष्ट्राची बदनामी करणारं आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
