🕒 1 min read
मुंबई- बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरणी बातम्या प्रसारित करताना डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज यांसरख्या शब्दांचा उल्लेख केल्यामुळे बॉलिवूडकरांच्या भावना दुखावल्या गेल्याचं देखील याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे CINTAA आणि IFTPCयांसारख्या संस्थेसह ३८ प्रॉडक्शन हाऊनने आवाज उठवला आहे.
[BREAKING] Suit has been filed before Delhi High Court by four Bollywood industry Assns & 34 leading Bollywood producers AGAINST
Republic TV
Arnab Goswami
Pradeep Bhandari
Times Now
Rahul Shivshankar
Navika Kumar @navikakumar @pradip103 @RShivshankar #ArnabGoswami pic.twitter.com/NXAP4w1Uvp— Bar and Bench (@barandbench) October 12, 2020
रिपब्लिक, टाइम्स नाऊ तसेच सोशल मीडियावरून बॉलिवूड आणि कलाकारांवर होणारी बेजबाबदार, अवमानकारक टिप्पणी थांबवण्यात यावी. तसेच बॉलिवूड कलाकारांची मीडिया ट्रायल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप रोखण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल
- कॉंग्रेसला तगडा झटका : कॉंग्रेसची साथ सोडत अभिनेत्री खुशबू सुंदर यांचा भाजपमध्ये प्रवेश
- देशात 60 लाख कोविड रुग्ण झाले बरे; अर्ध्याहून अधिक रुग्ण ‘या’ पाच राज्यातले
- ‘वीजपुरवठा खंडीत होणं हे दुर्भाग्यपूर्ण असून महाराष्ट्राची बदनामी करणारं आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
