🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. राज्याच्या विविध ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली असून शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे.
राज्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली, मात्र मंदिरे खुली करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले असून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली, तरीही मंदिर सुरू करण्यास राज्य सरकार दिरंगाई करत आहे. दारूच्या दुकानापासून ते मॉल उघण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात. मग, मंदिरांबाबतच वेळ काढू पणाचे धोरण का? असा सवाल शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून केला जात आहे.
शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. १७ मार्च पासून मंदिर बंद असल्याने शिर्डीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. दरोरोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात.
शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हार-फुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात
- गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- जाणून घ्या राज्यात कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या घटून झाली चार अंकी झाली का ?
- गरिब आणि शेतकऱ्यांचे जीवन सोपं बनवणे, हाच बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचा मूळ मंत्र होता – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
