Share

गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?

Published On: 

मुंबई- बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणी बातम्या प्रसारित करताना डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज यांसरख्या शब्दांचा उल्लेख केल्यामुळे बॉलिवूडकरांच्या भावना दुखावल्या गेल्याचं देखील याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे CINTAA आणि IFTPCयांसारख्या संस्थेसह ३८ प्रॉडक्शन हाऊनने आवाज उठवला आहे.

रिपब्लिक, टाइम्स नाऊ तसेच सोशल मीडियावरून बॉलिवूड आणि कलाकारांवर होणारी बेजबाबदार, अवमानकारक टिप्पणी थांबवण्यात यावी. तसेच बॉलिवूड कलाकारांची मीडिया ट्रायल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप रोखण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रानावतने या मुद्द्यावरून देखील या बॉलिवूडकरांवर निशाणा साधला. “बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळलं का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली. अन् त्याचमुळे आज एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय. याचाही सर्व हिशेब माझ्याकडे आहे.” अशा आशयाची दोन ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!