Share

“राक्षसी वृत्तीचं मुंडके छाटल्या शिवाय महाकाली शांत होणार नाही” ; रुपाली पाटील चंद्रकांत पाटलांवर कडाडल्या

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नुकतेच चंद्रकात पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. ‘राजकारणात तुम्ही कशाला आहात, स्वयंपाक करायला जा,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता याच वक्तवाच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाले की, “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्या शिवाय शांत होत नसते. बेताल,सत्तापिपासू चंपा.” अशा आशयाचं ट्वीट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.

 

चंद्रकात पाटील काय म्हणाले होते ?

“तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या.”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या ?

देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली. त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक सल्ला दिला.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!