Share

“मी कधीही कोणत्याही स्त्रीचा अनादर केलेला नाही…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना “तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा.”, असा खोचक सल्ला त्यांनी दिला होता. यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी आपल्या वक्तव्याचे साप्ष्टीकरण दिले आहे.

“माझ्या वक्तव्याचा जो पराचा कावळा केला गेला, त्यावर सुप्रियाताईंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मी कधीही कोणत्याही स्त्रीचा अनादर केलेला नाही. सुप्रिया सुळेच नाही तर कोणत्याही महिलेला आदर देण्याचा माझा स्वभाव आहे. पोरालाही आई मसणात जा असं म्हणते. याचा अर्थ त्याला स्मशानभूमीत जा असा नाही होत. काही जमत नसेल तर सोड बघू असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंबद्दल अनादर नाही. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आदराने एकमेकांची चौकशी करतो.”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या.”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली. त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक सल्ला दिला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!