टीम महाराष्ट्र देशा – भाजपला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी एकत्र पॅनल करून निवडणूक लढवणार आहे.
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली असून आगामी काळातील सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र महाविकास आघाडी करूनच एकत्र लढणार आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची माहिती दिली. तसेच याबाबत जागावाटपाची बोलणी सुरु झाल्याचंही त्यांनी सांगितल आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन लढवणार असल्याची माहिती दोनच दिवसापूर्वी देण्यात आली होती. आता बाजार समितीतही आघाडीच आव्हान भाजप समोर असणार आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

