मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनी केलेले समाजकार्य सर्वाना माहित आहे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम जोतीरावांनी केले. त्याच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पुर्ण झाले असून उर्वरीत चित्रीकरण हे मे महिन्यात करण्यात येणार आहे. या चित्रपटात महात्मा ज्योतीरावांच्या भूमिकेत अभिनेता संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाई फुलेंच्या भुमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले आहे. १९व्या शतकाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटासाठी मोठे भव्य सेट उभे केले आहे. तसेच या चित्रपटात व्हिएफएक्स या तंत्राचा वापरही करण्यात आला आहे.
काही दिवसापुर्वी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनीही महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावीत्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित क्रांतीसूर्य आणि क्रांतीज्योती या दोन चित्रपटांची घोषणा केली आहे. तसेच काही दिवसापुर्वी सोनी मराठी या वाहिनीवर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका आली होती. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ही मालिका अर्ध्यातच बंद झाली.
महत्वाच्या बातम्या
- ‘जे ऍक्टर होऊ इच्छितात त्यांनी ‘हे’ शिकावं’
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- ‘ब्रेक द चैन’मुळे प्राजक्ता उदास, लिहिली ‘ही’ पोस्ट
- कामगारांची कोरोना तपासणी न केल्याने मेडिकल व्यावसायिकांना दंड
- शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ;तब्येत स्थिर – नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

