🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल(३० जाने.)जेईएस कॉलेजच्या गांधी स्टडी सेंटरने आयोजित केलेल्या ‘कर के देखो’ या कार्यक्रमात बोलत असतांना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी(Tushar Gandhi) यांनी वेदनादायी प्रतिक्रिया दिली. महात्मा गांधींच्या शिकवणीचे पालन करणार्यांची संख्या देशात कमी होत असून नथुराम गोडसेची विचारधारा प्रबळ होत चालली आहे, असे तुषार म्हणाले.
यावेळी बोलत असतांना तुषार गांधी म्हणाले की, ‘महात्मा गांधींची शिकवण संपुष्टात येत असून मारेकरी नथुराम गोडसेची विचारधारा हाती घेतली जात आहे. परंतु काही लोकांचा वर्ग इतिहासाशी छेडछाड करीत असला तरी आपल्याला खरा इतिहास पुनरुज्जीवित करायचा आहे. तसेच धर्म, जात, प्रदेश या आधारावर आपण विभागलो असून आपली फूट ही आपली ओळख, मानसिकता आहे’, असे तुषार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राष्ट्र म्हणजे केवळ सीमा, ध्वज आणि नकाशा नसून राष्ट्र ही एक भूमी आहे ज्यावर सर्व मानव राहतात. लोकच राष्ट्र घडवतात.’ असेही तुषार गांधी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
“अमृता फडणवीस आमच्या सुनबाई”, ‘त्या’ ट्वीटवर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर
-
राज्यात अनेक प्रश्न असून सरकारला केवळ मद्यविक्रीत रस- नवनीत राणा
-
“मुंबईत २५ वर्ष सत्ता असुनही शिवसेनेने रस्ते बांधले नाही, आता निवडणुकीसाठी…”
-
“…तर वाईन विक्रीचा निर्णय शेअरच्या किमती वाढवायला घेतलाय?”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
