Share

“अमृता फडणवीस आमच्या सुनबाई”, ‘त्या’ ट्वीटवर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधण्याचा त्या एकही मौका सोडत नाहीत. त्यांनी काल (३० जानेवारी ) खोचक ट्वीट करत नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) ,राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यांनी नाना पटोले यांना नन्हे पटोले म्हटले होते, यावरच नाना पटोले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

“अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत. त्यामुळे त्यांच्या ट्वीट किंवा वक्तव्याबाबत आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही”, असे खोचक प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले आहे. काल त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिले.

अमृता फडणवीस यांचे ट्वीट-

“थोडक्यात उत्तर द्यावे…५० मार्क्स, नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? तसेच रिक्त स्थानाची पूर्ती करा…५० मार्क्स, _____शराब नही होती! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है!” असे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.

दरम्यान वाईनविक्रीसंबंधी निर्णयावरून भाजपकडून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले जात आहे. भाजपने या निर्णयाला जोरदार विरोध करत महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा घाट असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरच अमृता फडणवीस यांनीही निशाणा साधल्याचे दिसते. तर काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टाइम्स ऑफ इंडिया मधील आरके लक्ष्मण यांचे एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. ज्यात प्रमोद महाजन शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे निर्देश घेताना दिसून आले होते. यावरच भाजप नेत्या पूनम महाजन यांनी “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.” अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!