Share

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर तर आज ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांत ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार १४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

तर आज दिवसभरात १४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५३ हजार १८२ इतकी आहे.

दरम्यान आता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी केली आहे.

पण आता कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता धुसर झाल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तरी, अन्या लाटांप्रमाणे कोरोना विषाणूची तिसरी लाट प्राणघातक नसेल, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनं यावर टिप्पणी करण्याचं टाळलं आहे. पण काही सदस्यांनी सांगितलं की, तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे. तिसरी लाट आलीच तर ती फार पसरणार नाही. असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!