लडाख : एप्रिल महिन्यापासून भारत-चीन देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला गेलेला पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका होऊन देखील त्या निष्फळ ठरत आहेत. तर चीनच्या घुसखोरीचे अनेक डाव उधळून लावत भारतीय सैन्य देखील चोख प्रत्युत्तर देत आहे.
लडाख सीमेवर कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राचे वीरपुत्र सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आले आहे. यानंतर, त्यांच्या बलिदानाला सलाम केला जात असून या घटनेमुळे महाराष्ट्रवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाधव हे मूळचे पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र होते.
शहीद सचिन जाधव यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. भारत-चीन यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात हे जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तारळे येथे पार्थिव पोहोचल्यानंतर तिथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसाळे गावापर्यंत त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून घेऊन गेले. गावागावात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर फुलांचा सडा टाकला.
शहीद जवान सचिन जाधव हे तीन महिन्यांपूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. मात्र भारत चीन तणाव वाढत असल्यामुळे त्यांची एक महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच येऊन गेलेल्या सचिन यांच्या अशा जाण्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- #Breaking_News : मंत्री बच्चु कडू यांना कोरोनाची लागण
- #मराठा_आरक्षण : खासदार संभाजीराजेंनी टीकाकारांना दिलं खरमरीत प्रत्युत्तर
- मराठा आंदोलन रोखण्यासाठीच मुंबईमध्ये जमावबंदी ; चंद्रकांत पाटलांचा आरोप
- ‘नशीब आता मी जेल बाहेर आहे’ ; छगन भुजबळांना आठवलं कारागृह
- अहमदनगरची कोरोना स्थिती हाताळण्यासाठी आलेले मुश्रीफ, दुसऱ्या दिवशी स्वतः कोरोना बाधित झाले!


